मन म्हणजे मेंदू जे काही करतो ते
जे न्यूरॉन्स सतत सक्रिय होत असतात, ते स्मृती, गाणी आणि गाण्यांच्या आकलनाशी निगडित असतात. आणि ते सक्रिय होतात तेव्हा जणू तुम्ही प्रत्यक्ष ते गाणेच ऐकल्यासारखे वाटते. कारण तुम्ही माझा आवाज ऐकता किंवा एखादे गाणे ऐकता, तेव्हा तुम्ही कधीच गाणे ऐकत नसता. तुमच्या कानापर्यंत येणाऱ्या ध्वनीचा तुमचे न्यूरॉन्स जो अर्थ लावतात, तेच तुम्ही नेहमी ऐकत असता. या अर्थाने आणि अगदी मूलभूत पातळीवर, तुमचे मन म्हणजे तुमचा मेंदू जे काही करतो तेच होय.
प्रा. जॉन गॅब्रिएली यांचे संपूर्ण व्याख्यान पाहा
प्रशिक्षक